शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

SPPU | पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनला पुन्हा 'लिडर्स' चा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:16 IST

रिसर्च पार्क फाऊंडेशन ही सेक्शन ८ अंतर्गत येणारी कंपनी आहे..

पुणे : महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन' ला (sppu research park foundation) 'लिडर्स' चा दर्जा मिळाला असून पाच कोटी रुपयांचा सीड फंड देखील मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) रिसर्च पार्क फाऊंडेशन ही सेक्शन ८ अंतर्गत येणारी कंपनी आहे.

मागील वर्षी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला हा 'लिडर्स'चा दर्जा देण्यात आला होता. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील १७ नवोपक्रम केंद्रांमध्ये फाऊंडेशनला हा दर्जा मिळाला आहे तर सोलापूर विद्यापीठाच्या 'उद्यम' आणि अकोल्यातील 'पीडीकेव्ही' या केंद्रांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. ही दोनही केंद्र सुरूवातीच्या टप्प्यामधे गणली जातात.

रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून २०१९ मध्ये ११, २०२० मध्ये २७ तर  २०२१ मध्ये ५० स्टार्टअपवर काम सुरू असल्याचे विद्यापीठातील इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.

डॉ. पालकर म्हणाल्या, फाऊंडेशनच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाशी संबंधित काही प्रमुख स्टार्टअपमध्ये प्रॉप स्पेसमधील कोग्निलिमेंट, ऍग्री टेकमधील इनोव्हेशन, हेल्थटेक मध्ये दिपटेक, सोशल इनोव्हेशनमध्ये सोशल इंडेक्स चा समावेश आहे.

विद्यापीठ आय टू ई, पिच फेस्टबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अनेक स्टार्टअप विषयक स्पर्धा दरवर्षी घेते. त्यातून अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्याचेही पालकर यांनी सांगितले.

तीन वर्षांच्या अल्प कालावधीत विद्यापीठाने केलेल्या कामाची ही पावती आहे, असे मी समजते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीने अकोला आणि सोलापूर येथील नवोपक्रम केंद्राचे मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली याचा नक्कीच आनंद आहे. - डॉ. अपूर्वा पालकर, संचालिकानवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडscienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान