‘ओबीसीं’चे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:08 IST2021-06-26T04:08:46+5:302021-06-26T04:08:46+5:30
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निमगाव येथील श्री संत सावतामाळी मंदिरात सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते ...

‘ओबीसीं’चे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा इशारा
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निमगाव येथील श्री संत सावतामाळी मंदिरात सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवराज जाधव, दशरथ डोंगरे, वसंत मोहोळकर, माऊली बनकर, मच्छिंद्र चांदणे, मोहन दुधाळ, बापुराव शेंडे, अमर बोराटे, दत्तात्रय शेंडे, भारत शिंदे, अनिल राऊत, सौरभ शिंदे, बाबासाहेब भोंग, नामदेव शिंदे, तुषार खराडे, राजू भोंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
अॅड. कृष्णाजी यादव म्हणाले की, १९३१ नंतर ओबीसी समाजाचे जातीनिहाय जनगणना झाली नाही. प्रत्येक समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली आहे. ओबीसी समाजावर अन्याय का? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. याविरोधात समस्त ओबीसी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी(दि. २६) श्रीसंत सावता माळी मंदिर येथे ओबीसी समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी (दि. २६) श्रीसंत सावता माळी मंदिर येथे ओबीसी समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे. प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केले, तर आभार तात्यासाहेब वडापुरे यांनी मानले.
ओबीसी आरक्षण पूर्ववत मिळून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे बैठक पार पडली.
२५०६२०२१-बारामती-१०