शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Gautami Patil Viral Video: गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची रुपाली चाकणकरांकडून दखल; पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 23:41 IST

Gautami Patil Viral Video: गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Gautami Patil Viral Video: गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

गौतमी पाटीलचे कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना चित्रिकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोनिका धुमाळ यांनी ही तक्रार दिली आहे. गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत. यातच रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले आहे. 

महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा

रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केले आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग,  पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.  हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील, असे रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, कपडे बदलताना हा व्हिडीओ चोरून चित्रित करण्यात आला. तसेच नंतर गौतमी पाटीलला बदनाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तीन इन्स्टाग्राम अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीने गौतमी पाटील ही कपडे बदलत असताना तिचे व्हिडीओ चित्रित करून काढलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून तसेच फिर्यादी व इतर सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस