‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजी

By Admin | Updated: October 25, 2015 03:43 IST2015-10-25T03:43:21+5:302015-10-25T03:43:21+5:30

केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या

State rally in 'Smart City' meeting | ‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजी

‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजी

पुणे : केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या खासदार, आमदार व पक्षनेत्यांच्या बैठकीत मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेरीस यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्याचे ठरले.
महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चर्चेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात घेऊन एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा यावर सोमवारी दुपारपर्यंत एकमताने निर्णय देऊ, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासनाला सांगितले. बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, नीलम गोऱ्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे आदी बैठकीला उपस्थित होते.
आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वांना ‘स्मार्ट सिटी’ योजनेत प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. सध्या तिसरा टप्पा सुरू असून त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे. शहरातील एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी योजनेत स्वतंत्र निधी मिळेल असे ते म्हणाले. अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार शिरोळे यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा, असे मत व्यक्त केले. महापालिकेने स्वत:चा फंड तयार होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, त्यामुळे सरकार बदलले, योजनेत काही बदल झाले,निधीचा प्रश्न उभा राहिला तरी त्यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले.

स्मार्ट सिटीसाठी सर्वपक्षीय खासदार,
आमदार असे प्रथमच एकत्र आले होते. बापट यांनी या कामात कसलाही पक्षीय अभिनवेश नाही असे स्पष्ट केले, तरीही राष्ट्रवादी व काँग्रेस एका बाजूला, भाजप एकीकडे व मनसे, सेना वेगवेगळे असे चर्चेतून स्पष्ट दिसत होते. खासदार वंदना चव्हाण या बैठकीला उपस्थित नव्हत्या.
स्थानिक कंपन्यांच्या समावेशाचा मुद्दा
सेनेच्या गोऱ्हे यांनी उपस्थित करताच
मनसेच्या राजेंद्र वागस्कर यांनी मनसेचे २८ नगरसेवकांना सोडून कोणालाच पुुढे जाता येणार नाही असे सांगितले. त्यावर बापट यांनी मोठा भाऊ, मोठा भाऊ अशी टिप्पणी करताच गोऱ्हे यांनी यावर वेगळी चर्चा होऊ शकते’ असे उत्तर दिले.

एरिया डेव्हलमेंटच्या मुद्द्यावर सर्वांचे एकमत व्हावे अशी बापट यांची अपेक्षा होती. मात्र आमदार गोऱ्हे तसेच काँग्रेसचे पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्याला विरोध केला. याबाबत पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे, त्यामुळे थोडा कालावधी द्यावा असे ते म्हणाले. संमती द्यावी यासाठी पालक मंत्री गिरीश बापट सुरूवातीला आग्रही होते, मात्र
गोऱ्हे यांनी वेळ द्यावाच लागेल,
अशी आग्रही भूमिका घेतल्यानंतर याबाबत सोमवारी निर्णय देऊ, असे आयुक्तांना
सांगितले.

सध्या तिसरा टप्पा सुरू असून एरिया डेव्हलपमेंटसाठी एखाद्या परिसराची निवड करायची आहे

प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे.

Web Title: State rally in 'Smart City' meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.