राज्यातील पोलीस पाटलांनी मुळशी पॅटर्न राबवावा: शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:49+5:302021-09-06T04:13:49+5:30

वेल्हे येथील आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव ...

State police patrols should follow the basic pattern: Shinde | राज्यातील पोलीस पाटलांनी मुळशी पॅटर्न राबवावा: शिंदे

राज्यातील पोलीस पाटलांनी मुळशी पॅटर्न राबवावा: शिंदे

वेल्हे येथील आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा काळभोर, पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे, महिला अध्यक्ष तृप्ती मांडेकर, माजी अध्यक्ष भिकोबा रणखांबे, कार्यकारी अध्यक्ष विजय कुंजीर, जिल्हा उपाध्यक्ष नथुराम सुकाळे, वेल्हे तालुकाध्यक्ष बाळासाहेब रसाळ, मुळशी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय रानवडे, भोर तालुका अध्यक्ष अनिल डोंबे, संपर्कप्रमुख गणेश निमसे, पुरंदर तालुका संघटक अमोल लोंढे, दौंड तालुकाध्यक्ष अविनाश शेंडगे, माजी अध्यक्ष ज्योतिबा भगत, राजेंद्र दळवी, दत्तात्रय दसवडकर, सुरेश चव्हाण आदींसह पोलीस पाटील उपस्थित होते. व्हिलेज येथील लक्ष्मी गंगा कार्यालय येथे तालुक्यातील पोलीस पाटलांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील पोलीस पाटलांना सध्या अत्यल्प मानधन मिळत आहे, त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे यासाठी मुळशी तालुक्यातील कार्यकारी अध्यक्ष विजय कुंजीर, मुळशी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय रानडे यांनी व मुळशी तालुक्यातील पोलीस पाटलांनी मुळशी तालुका पोलीस पाटील सहकारी पतसंस्था स्थापन केली असून, या पतसंस्थेमार्फत तालुक्यातील पोलीस पाटलांना व्यवसाय उभारण्यासाठी अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे, येथील पोलीस पाटील या पतसंस्थेमधून कर्ज घेऊन आपला व्यवसाय निर्माण करत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विविध तालुक्यातील पोलीस पाटलांनी अशा पतसंस्थेची निर्मिती करून आपला स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा, राज्यातील पोलीस पाटलांनी मुळशी पॅटर्न राबवावा असे आवाहन या वेळी शिंदे यांनी केले. तसेच पोलीस पाटलांचे मानधन वाढ होण्यासाठी प्रयत्न करणार, शासन दरबारी पोलीस पाटलांच्या मागण्यासाठी नियमित पाठपुरावा करत असून प्रसंगी मोठमोठी आंदोलने देखील करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कांबळे यांनी केले, तर आभार बाळासाहेब रसाळ यांनी मानले.

Web Title: State police patrols should follow the basic pattern: Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.