राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धां सासवड येथे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:15+5:302021-02-05T05:08:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूकाका जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी बाळासाहेब भिंताडे, महाविद्यालयाचे प्राचार्य ...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धां सासवड येथे सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूकाका जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी बाळासाहेब भिंताडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले, उपप्राचार्य संपत जगदाळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. ऋषिकेश कुंभार, प्रा. दिलीप गरुड, डॉ. संजय झगडे, डॉ. नाना झगडे, डॉ. सुभाष नप्ते, डॉ. विशाल पावसे, डॉ. तुषार घोरपडे, प्रा. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे संयोजन एफ. बी. क्लब सासवडचे शीतलकुमार माने, इम्रान शेख, चेतन मेमाणे, प्रदीप सुर्यवंशी, मंगेश शिंदे, योगेश ताकवले, किरण जाधव, प्रभाकर आडेकर यांनी केले आहे.
या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले असून या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण रविविरी होणार आहे.
सासवड येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा सुरु