प्राचार्य बशीर शेख यांना राज्यस्तरीय भाषारत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST2021-02-26T04:13:34+5:302021-02-26T04:13:34+5:30

गोवा येथील मीरामार येथील सोलपार सभागृहात सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री ...

State Level Bhasharatna Award to Principal Bashir Sheikh | प्राचार्य बशीर शेख यांना राज्यस्तरीय भाषारत्न पुरस्कार

प्राचार्य बशीर शेख यांना राज्यस्तरीय भाषारत्न पुरस्कार

गोवा येथील मीरामार येथील सोलपार सभागृहात सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप, हिंदी गोवा अकादमीचे सुनील शेठ, बिजूभाई उद्योग समूह गुजरात बिजूभाई, भारत सरकार नियोजन समितीचे सदस्य कैलास जाधव, राज्य समन्वयक सुरेश कोडग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल, बुके असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्राचार्य बशीर शेख यांना हा पुरस्कार मिळाल्याने श्रीगजानन महाराज शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक विभागात मानाचा शिरपेच खोवला आहे, असे मंडळाचे अध्यक्ष व पुणे मनपाचे नगरसेवक विशाल तांबे म्हणाले. उपाध्यक्ष वैभव तांबे, श्रीहरी तांबे, मयूर ढमाले, संचालिका नीलम तांबे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्राचार्य शेख यांचे अभिनंदन केले.

Web Title: State Level Bhasharatna Award to Principal Bashir Sheikh