शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:08 IST

यापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता सरकारने केली नाही. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास  राज्यभर आंदोलन केले जाईल.

ठळक मुद्देलाक्षणिक उपोषण : सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयांवर नेणार मोर्चानिर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार

 पुणे : राज्य सरकारने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर (एसटी) आरक्षण कृती समितीने दिला आहे. कृती समितीच्या वतीने पुणे स्टेशान जवळील विधानभवन येथे शुक्रवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार रामदास वडकुते, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, रमेश शेंडगे, मदन देवकाते, परमेश्वर कोळेकर, बाळासाहेब करगळ, दादाभाऊ काळे, भिमदेव बुरुंगले, शिवाजीराव इजगुडे या वेळी उपस्थित होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय न घेतल्यास सुरुवातीस राज्यभर मोर्चा आंदलने करण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर २४ आॅगस्टला मोर्चा नेण्यात येईल. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आठ सप्टेंबरच्या पुण्यातिथी दिनापासून राज्यभर आंदोलनास सुरुवात केली जाईल. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराही कृती समितीने दिला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या प्रमुख मागणीबरोबरच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, शेळी मेंढी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी देणे, या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये व्यवसायासाठी अनुदान देणे, प्रत्येक तालुक्यामध्ये या समाजातील मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावेत अशा विविध मागण्या कृती समितीकडून करण्यात आल्या आहेत. आमदार वडकुते म्हणाले, या पुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता सरकारने केली नाही. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास  राज्यभर आंदोलन केले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीला राज्य सरकार जबाबदार असेल.आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी  देवकाते यांनी केली. 

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षण