शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाला कोर्टात खेचणार

By admin | Updated: August 25, 2015 05:01 IST

राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: बंद केल्याने महापालिकांची आर्थिक स्वायत्तता जवळपास संपुष्टात आहे. एलबीटी किंवा जकात पुन्हा सुरू करावी अन्यथा

पुणे : राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: बंद केल्याने महापालिकांची आर्थिक स्वायत्तता जवळपास संपुष्टात आहे. एलबीटी किंवा जकात पुन्हा सुरू करावी अन्यथा महापालिकेच्या वतीने राज्य शासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असा प्रस्ताव सोमवारी मुख्यसभेत मंजूर करण्यात आला. मात्र, हा प्रस्तावही कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाने एक आॅगस्टपासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांची एलबीटी नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. जकातीऐवजी आलेला एलबीटी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आर्थिक स्वायतत्ता धोक्यात आली आहे. यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. उपमहापौर आबा बागुल यांनी या संदर्भात सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव ठेवला होता.सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष मनसेने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला. राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. ही मागणी आधी राज्य शासनास केली जाणार असून, त्यानंतर शासनाने निर्णय न घेतल्यास महापालिकेने न्यायालयात जावे, असा हा प्रस्ताव आहे.ठराव कागदावरच!एलबीटी किंवा जकातीसाठी न्यायालयात जाण्याचा ठराव करणारी पुणे महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. मात्र, आयुक्त हे शासन नियुक्त प्रतिनिधी असल्याने या पूर्वी विकास आराखड्यासाठी न्यायालयात जाण्यास महापालिका आयुक्तांनी नकार दिला होता.