कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे राज्य सरकार होणार ‘मायबाप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST2021-05-22T04:10:06+5:302021-05-22T04:10:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे आई-बाबा गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच शासनाने आशा बालकांना आधार ...

State government to be 'parents' of children who lost their parents due to corona | कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे राज्य सरकार होणार ‘मायबाप’

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे राज्य सरकार होणार ‘मायबाप’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे आई-बाबा गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच शासनाने आशा बालकांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना आजारामुळे आपले आई-वडील दोन्ही गमावलेल्या बालकांची माहिती नागरिकांनी १०९८ या चाईल्ड हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.

कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात येतील. त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदलाची स्थापना केली आहे. या कृती दलाची बैठक कटारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होत्या. या बैठकीला पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती उपलब्ध करून घ्यावी, अशा सूचना डॉ. कटारे यांनी दिल्या. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कल्याण समिती यांच्यामार्फत त्यांचे आर्थिक व मालमत्ताविषयक तसेच कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी. या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी व दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

------------------------

बालकांची योग्य दक्षता घेणार

पोलीस उपायुक्त घट्टे म्हणाले, कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालके बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत, अशा बालकांचे शोषण होणार नाही, बालकामगार म्हणून त्यांची आस्थापनेवर नेमणूक होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल तसेच असे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक ती पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल.

-----

Web Title: State government to be 'parents' of children who lost their parents due to corona