शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

राज्य नाट्य स्पर्धेकडे ओढा वाढतोय

By admin | Updated: November 16, 2016 02:20 IST

राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांनी रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले. मधल्या काळात नाट्य स्पर्धांमध्ये काहीशी

प्रज्ञा केळकर-सिंग / पुणेराज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांनी रंगभूमीला अनेक दिग्गज कलाकार दिले. मधल्या काळात नाट्य स्पर्धांमध्ये काहीशी उदासीनता निर्माण झाली होती. मात्र, सद्य:स्थितीत भरघोस प्रतिसाद मिळत असून, या स्पर्धेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. यंदा राज्य नाट्य स्पर्धेचे ५६वे वर्ष असून पुणे विभागात एकूण ९५ संघ सहभागी झाले आहेत.महाराष्ट्राला मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमी हे जीवनानुभव देणारे, बहुश्रुत करणारे माध्यम आहे. मराठी संस्कृतीचे लेणे असलेल्या रंगभूमीने अनेक दिग्गज कलावंत घडवले. या कलावंतांच्या जडणघडणीत नाट्य स्पर्धांनी मोलाची भूमिका बजावली आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्त्वविकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा उद्देश ठेवून शासनातर्फे राज्य नाट्य स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांना गेल्या काही वर्षांमध्ये मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातही राज्य नाट्य स्पर्धांमधून रंगभूमीला दर्जेदार कलावंत मिळतील, अशी आशा आहे.राज्यातील एकूण १९ केंद्रांवर तसेच दिल्ली व गोवा या केंद्रांसह नोव्हेंबर महिन्यात राज्य नाट्य स्पर्धांच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होते. यंदाही नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य नाट्य स्पर्धांचा पडदा उघडला असून, विविध केंद्रांवर प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे. पुणे विभागात २०१६-१७ या वर्षी ९५ संघांनी सहभाग घेतला आहे. २०१५-२०१६ या वर्षात सहभागी झालेल्या संघांची संख्या ८१ होती.राज्य नाट्य स्पर्धेतून कलावंतांना अनुभवाची आणि संस्कारांची शिदोरी नेता यावी, या दृष्टीने स्पर्धेचे परीक्षक आणि सहभागी संस्था यांच्यातील संवादाचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे. अंतिम हौशी नाट्य स्पर्धेत प्रथम बक्षीस ३ लाख, द्वितीय २ लाख तर तृतीय क्रमांकाला १ लाखाचे बक्षीस शासनातर्फे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५ लाख, द्वितीय ३ लाख तर तृतीय क्रमांकाला २ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.(प्रतिनिधी)