शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचा अर्थसंकल्प : पुणे मेट्रोसाठी मिळणार ४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:41 IST

राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्गीकरण दिलेले नाही.

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पातून पुण्यासाठी फार मोठा फायदा दिसत नसला तरी दोन मोठ्या प्रकल्पांसाठी मात्र तरतूद करण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ४५ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील ८ स्मार्ट सिटीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत; मात्र त्याचे वर्गीकरण दिलेले नाही.मेट्रोसाठी नागपूर व पुणे असे दोन्ही प्रकल्प मिळून ९० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात आहे. त्यामुळे त्यातील ४५ कोटी रुपये पुण्याला मिळणे अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकारची नागपूर मेट्रोवर विशेष मेहेरनजर आहे. याधीही त्यांच्यासाठी जास्त तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे कामही पुणे मेट्रोपेक्षा जास्त लवकर सुरू झाले व आता लवकरच मेट्रोची दुसरी चाचणीही घेण्यात येणार आहे.त्या तुलनेत पुण्याच्या मेट्रोचे काम मात्र संथपणे सुरू असल्याची टीका होत आहे. तरीही आता थेट ४५ कोटी रुपये मिळणार असल्याने कामाला गती येईल, असे दिसते आहे. नागपूर मेट्रोची चाचणी होत असताना पुणे मेट्रोचे मात्र अद्याप खांबही जमिनीतून वर येण्यास तयार नाहीत असे बोलले जाते. त्यामुळे महामेट्रो कंपनीने आता पुण्यातील मेट्रोच्या कामाची गती वाढवली आहे.तरतुदीतील अधिक निधी मिळण्याची शक्यतादेशात दुसºया क्रमांकावर आलेल्या पुणे शहरासह राज्यात एकूण ८ स्मार्ट सिटी आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू राहणार आहे. त्यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. या निधीचे वर्गीकरण देण्यात आलेले नाही; मात्र पुणे शहराची लोकसंख्या व स्मार्ट सिटी योजनेतंर्गत केलेले काम यामुळे पुण्याच्या वाट्याला यातून जास्त निधी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे