कात्रज डेअरीत अत्याधुनिक दूध तपासणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:19+5:302021-01-08T04:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज डेअरीमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक दूधतपासणी यंत्राचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते करण्यात ...

State-of-the-art milk testing machine at Katraj Dairy | कात्रज डेअरीत अत्याधुनिक दूध तपासणी यंत्र

कात्रज डेअरीत अत्याधुनिक दूध तपासणी यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज डेअरीमध्ये बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक दूधतपासणी यंत्राचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक मशिनच्या साहाय्याने दुधाच्या २९ प्रकारच्या तपासण्या अधिक अचूकपणे व कमी वेळेत (३० सेकंदात) होण्यास मदत होणार आहे. सदरचे मशिन केंद्र शासनाच्या एनपीडीडी या योजनेअंतर्गत १००% अनुदानावर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत संघास मिळालेले असून याची किंमत ८२ लाख एवढी आहे.

उद्घाटनानंतर सुप्रिया सुळे यांनी कात्रज उत्पादनांची माहिती जाणून घेतली. कात्रज डेअरीच्या विविध उत्पादनांबद्दल समाधान व्यक्त केले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका अमृता बाबर, नगरसेवक सुधीर कोंढरे, उपाध्यक्ष वैशाली गोपालघरे, संचालक रामचंद्र ठोंबरे, बाळासाहेब खिलारी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, कामगार नेते चंद्रकांत कदम व विजय भाडळे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: State-of-the-art milk testing machine at Katraj Dairy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.