शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:26 IST

वाहनचालक, पादचाऱ्यांना दिलासा; पावसामुळे कामास अडथळा

देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कामानंतर जाग आलेल्या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या पालिकेच्या या निर्णयामुळे तात्पुरते अपघात तरी थांबले असून, वाहनचालकांना व पायी चालणाºयांना दिलासा मिळाला असल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी(दि. २१) रोजी नागरिकांना कीव, पण प्रशासन निगरगठ्ठ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मंगळवारीच रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले होते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे समतल करून घेतले व काही खड्ड्यांमधील पाणी रस्त्याच्या कडेला काढून देण्यात आले. या रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजविण्यासाठी जीएसबी वेटमिक्स साहित्याचा वापर केला आहे. मात्र मंगळवारी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या कामात सातत्याने अडथळे येत होते. हे खड्डे बुजविण्याचे काम आज पुन्हा सुरू होते. यासाठी जीएसबी वेट मिक्सचे पाच ते सहा ट्रक वापरण्यात येणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदाराने दिली.दरम्यान, प्रशासनाच्या असहकाराला कंटाळून गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन सक्षम लोकांच्या सहकार्यातून आपणच रस्त्याचे खड्डे बुजवायचे असा निर्णय झाला. वीटभट्टीचे रॅबिट व विटांचा चुरा रस्त्यावर टाकून त्याला समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविणार आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हे काम लवकरच पूर्ण करावे, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :dehuroadदेहूरोडPotholeखड्डे