साईडपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात

By Admin | Updated: November 17, 2016 02:09 IST2016-11-17T02:09:43+5:302016-11-17T02:09:43+5:30

मोई-कुरुळी मार्गी चिंबळीफाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती व साईटपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

Start the work of sidewalks | साईडपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात

साईडपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात

कुरुळी : मोई-कुरुळी मार्गी चिंबळीफाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती व साईटपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली.
मोई, ता. खेड येथील मोई-कुरुळीमार्गी चिंबळीफाटा जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी चाळण झाली आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे खड्डे व साईटपट्ट्यांना मुरूम टाकण्याचे काम सुरू
करण्यात आले आहे. वेळोवेळी रस्तादुरुस्तीची मागणीची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने व पाठपुरावा केल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा बातम्या केल्याबद्दल सरपंच शरद मुऱ्हे, सरपंच एकनाथ करपे, माजी सरपंच सोमनाथ गवारी, ग्राहक कक्षा अध्यक्ष चंदन मुऱ्हे, माजी उपसरपंच आशिष मुऱ्हे, राष्ट्रवादी कॉँगे्रसचे उपाध्यक्ष जालिंदर गवारी, ग्रामपंचयत सदस्य अरुण फलके, उद्योजक प्रसाद कर्पे, उद्योजक संतोष गवारी, उद्योजक रोहिदास गवारी, मारुती येळवंडे, शेखर कर्पे आदी ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Start the work of sidewalks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.