शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

डीपीसीतील कामे जुलैअखेर सुरू करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

By नितीन चौधरी | Updated: April 16, 2025 16:37 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारत वगळता जनसुविधा, नागरी सुविधांच्या पूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षीच्या कामांना मे महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊन येत्या जून-जुलैमध्ये निविदा काढून संबंधितांना कार्यारंभ आदेश द्यावेत. तसेच सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान विकासकामे पूर्ण करावीत. डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२६ या तीन महिन्यांत करायची आहे. काही कामांची तपासणी करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाला दिले आहेत.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षीच्या कामकाजांचा आढावा आणि २०२५-२६ या वर्षात करण्यात येणाऱ्या कामाबाबत डुडी यांनी मंगळवारी (दि. १५) आढावा घेतला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.डुडी म्हणाले, “२०२४-२५ मधील कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करा. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कामे ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. २०२४-२५ चा निधी शंभर टक्के खर्च करण्यात आला आहे. डीपीसीतील २०२५-२५ या आर्थिक वर्षात कामे सुचविताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच कामे सुचवा. ज्या जागांचे मालमत्तापत्रक वादविरहित आहे, अशाच मालकीच्या जागांवरच कामे सुचविण्यात यावी. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कामांसाठी ३१ मेपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यतांची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच जून, जुलैदरम्यान निविदा आणि कार्यारंभ आदेश द्यावेत. येत्या सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कामांची गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत.”जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारत वगळता जनसुविधा, नागरी सुविधांच्या पूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. आतापर्यंत डीपीसीची बैठक उशिरा होत असे. यावर्षी नियमित वेळेत बैठक झाली असून डीपीसीच्या निधी खर्चाच्या कार्यपद्धतीत पालकमंत्री अजित पवार यांनी बदल सुचविले आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्याऐवजी डिसेंबरपर्यंत निधी खर्च करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण झाल्यानंतर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत त्रयस्थ संस्थेकडून कामांची गुणवत्ता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२६ या तीन महिन्यांत करायची आहे. काही कामांची तपासणी करण्यात येईल. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रत्येक विभागाने एक प्रस्ताव नियोजन विभागास सादर करावा. यात नावीन्यपूर्ण कामांचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारीcivic issueनागरी समस्या