पुणे : आरोग्यविषयक स्टार्ट अप्सला मार्गदर्शन व चालना देऊन त्यांचे व्यावसायिकीकरण करण्याच्या उद्देशाने पूना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘स्कील्ड पीसीपी’ केंद्राची स्थापना केली आहे. नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योजकता विकासासाठी या केंद्राच उपयोग होणार आहे. यावेळी बीव्हीजी लाईफ सायन्सेस व पुना कॉलेजमध्ये औषध निर्मितीबाबतचा करार केला. यावेळी अमेरिकेतील बनकर सल्लासेवाचे अध्यक्ष प्रा. उमेश बनकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. जान्हवी राव उपस्थित होते.
स्टार्ट अप्सला मिळणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST