नदी पात्रतील विसजर्न घाटांच्या दुरुस्तीला सुरुवात
By Admin | Updated: August 22, 2014 00:09 IST2014-08-22T00:09:07+5:302014-08-22T00:09:07+5:30
वैभवशाली परंपरा असलेला गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेकडून गणोशोत्सवापूर्वी विसजर्न घाटांच्या स्वच्छतेचे तसेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

नदी पात्रतील विसजर्न घाटांच्या दुरुस्तीला सुरुवात
पुणो : वैभवशाली परंपरा असलेला गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेकडून गणोशोत्सवापूर्वी विसजर्न घाटांच्या स्वच्छतेचे तसेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात असे सुमारे प्रमुख 16 विसजर्न घाट असून, येत्या आठवडय़ात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
गणोशोत्सव 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे. शहरात अर्धा दिवस, दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस
तसेच सात दिवस आणि 11 दिवसांसाठी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे पहिल्या दिवसापासून विसजर्न घाटांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते.
मुठा नदीच्या काठावरील प्रमुख 16 विसजर्न घाट आहेत. हे घाट वारजे, कर्वेनगर, घोले रस्ता, कसबा-विश्रमाबाग वाडा, येरवडा, ढोले पाटील रस्ता, तसेच वडगावाशेरी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत
येतात. या घाटांवर गणोशमूर्ती विसजर्नासाठी विसजर्न हौद उभारण्यात आलेले आहेत.
गणोशोत्सवानंतर पालिकेकडून हे हौद मातीने भरून ठेवले जातात. त्या हौदाच्या स्वच्छतेचे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी
हौदांच्या रंगरंगोटीचे कामही सुरू करण्यात आले आहे.
हे काम या आठवडय़ात पूर्ण करून हौद विसजर्नासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
विसजर्न टाक्याही तयार
4विसजर्न हौदांबरोबरच महापालिकेकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ठिकठिकाणी विसजर्नासाठी लोखंडी पाण्याच्या टाक्यांचीही सुमारे 75 हून अधिक ठिकाणी सोय करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, या सर्व ठिकाणी या टाक्या प्रशासनाकडून पोहचविण्यात आल्या आहेत. या टाक्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संदेशही देण्यात आलेले आहेत. तसेच या ठिकाणी येणा:या भाविकांना गणोशमूर्तीची आरती करण्यासाठी स्वतंत्र टेबल आणि मांडवाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.