पीएमपीएल बस चौफुलापर्यंत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:50+5:302021-02-05T05:03:50+5:30
केडगाव : येथील अनेक कर्मचारी व विद्यार्थी पुण्याला ये-जा करत असतात. पीएमपीएमएल बस सेवा अगदीच हाकेच्या अंतरावर येऊन यवतपासूनच ...

पीएमपीएल बस चौफुलापर्यंत सुरू करा
केडगाव : येथील अनेक कर्मचारी व विद्यार्थी पुण्याला ये-जा करत असतात. पीएमपीएमएल बस सेवा अगदीच हाकेच्या अंतरावर येऊन यवतपासूनच हडपसरपर्यंत जाते. मात्र, हीच सेवा जर चौफुलापर्यंत दिली तर अनेक प्रवाशांना याचा लाभ मिळू शकतो. तरी पीएमपीएमएल बस चौफुलापर्यंत सुरू करावी, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली आहे.
यासंदर्भात, रमेश थोरात यांनी पीएमपीएमएलचक व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना निवेदन दिले आहे. या वेळी झुंबर गायकवाड, भाऊसाहेब ढमढेरे, सुशांत दरेकर, संतोष शेळके, सचिन शेळके, अनिल दिवार आदी उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्वी पीएमपीने हडपसर ते यवतपर्यंत बससेवा सेवा सुरू केली आहे. थोडी आणखी पुढे चौफुलापर्यंत सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. खासगी वाहनांनी प्रवास करताना सुमारे शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागतात. ही बस सेवा सुरू झाल्यावर अगदी वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचता येईल.
लॉकडाउनपूर्वी सुमारे केडगाव स्टेशनवरून सुमारे दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशी रेल्वेने दिवसभरात ये-जा करत होते. परिसरातील केडगाव,भांडगाव, देलवडी, पिंपळगाव खुटबाव, बोरिपारधी, पडवी येथील लोकांना पीएमएल बस सुरू केल्यास फायदा होईल.
फोटो : पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांना निवेदन देताना रमेश थोरात व मान्यवर.