सासवड - उरुळी कांचन मार्गावर पीएमपी बस सेवेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:40+5:302021-06-21T04:08:40+5:30
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथे हिरवा झेंडे दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएल चे ...

सासवड - उरुळी कांचन मार्गावर पीएमपी बस सेवेस प्रारंभ
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथे हिरवा झेंडे दाखवून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएल चे वाहतूक व्यवस्थापक दिलीप झेंडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राज्याचे युवा सरचिटणीस गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सासवड येथून बस सुरु झाल्यानंतर आंबोडी, वनपुरी, सिंगापूर, वाघापूर या ठिकाणी बसचे जोरदार स्वागत करण्यात आले. गावोगावी फटाके वाजवून आणि रांगोळीच्या पायघड्या घालून बसचे स्वागत करण्यात आले.
वनपुरी येथे सरपंच नामदेव आप्पा कुंभारकर यांच्या हस्ते बसचे स्वागत करून आमदार संजय जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच मंदानानी कुंभारकर, सदस्य लंकेश महामुनी, राजश्री कुंभारकर, संगीता कुंभारकर, माजी सरपंच रामदास कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, भीमा तात्या कुंभारकर, सुनील कामठे, भानुदास कुंभारकर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्व भागातील सर्वच गावच्या सरपंचांनी आमदार संजय जगताप यांना निवेदन देऊन सासवड ते माळशिरस आणि सासवड ते उरुळी कांचन अशी बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन आमदार जगताप यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्याशी बस सेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर आज लगेचच बससेवा सुरू करण्यात आली. हडपसरवरून बस सुटेल तसेच सासवड येथे बस आल्यानंतर वाघापूर मार्गे उरुळी कांचन असा प्रवास राहणार आहे.
वनपुरी ( ता. पुरंदर ) येथे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत बसचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव कुंभारकर, दत्तात्रय झुरंगे, सुनीता कोलते, गणेशराव जगताप आणि उपस्थित मान्यवर.