शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्टेशनसह मेट्रो स्थानकांपासून ‘शेअर ए रिक्षा’ योजनेला सुरूवात

By नितीश गोवंडे | Updated: August 9, 2023 22:26 IST

पुणे : शहरातील १८ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येत आहे. या मेट्रो स्थानकावरून शहरातील विविध भागात ये-जा ...

पुणे : शहरातील १८ मेट्रो स्थानकांवरून प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येत आहे. या मेट्रो स्थानकावरून शहरातील विविध भागात ये-जा करण्यासाठी आरटीओ प्रशासनाने आता ‘शेअर ए रिक्षा’ ही योजना सुरू केली आहे. शहरातील १८ मेट्रो स्टेशनवरून ही सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आरटीओच्या समितीने पुणे रेल्वे स्थानकासह मेट्रो च्या सर्व स्थानकांवर सर्व्हेक्षण केले. त्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात आता मेट्रो सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्ट ते पिंपरी चिंचवड, गरवारे ते रूबी हॉल ते वनाज या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरवात झाली आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्याने नागरिक देखील आता मेट्रोतून प्रवासाला प्राधान्य देत आहेत. 

मेट्रो स्थानकावर येण्यासाठी किंवा स्थानकावरून शहरातील इतर भागात ये-जा करण्यासाठी आता आरटीओ प्रशासनाकडून शेअर रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरटीओ प्रशासनाने एक समिती गठीत करून पुण्यातील मेट्रो स्थानकांवर सर्व्हे केला होता. या सर्व्हेअंती आरटीओच्या समितीने शहरातील अठरा स्थानकांवरून शेअर रिक्षा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. 

त्यानुसार आता या स्थानकांवरुन नागरिकांना माफक दरात रिक्षाने देखील प्रवास करता येणार आहे. ज्या नागरिकांना मीटर दराप्रमाणे रिक्षा आवश्यक आहे, त्यांना मीटरप्रमाणे रिक्षा उपलब्ध होणार आहे. या अठरा स्थानकांसह पुणे स्टेशनवरून देखील शेअर रिक्षा सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे स्टेशन ते पुलगेट, वाडीया कॉलेज, संचेती हॉस्पिटल या मार्गांवर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच, नागरिकांसाठी मीटर रिक्षांचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

...या स्थानकांवर शेअर रिक्षास्टॅण्ड..वनाज मेट्रो स्टेशन, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवाजे कॉलेज, पीएमसी, सिव्हील कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन, रुबी हॉल, शिवाजीनगर, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी - नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, पीसीएमसी या स्थानकांचा यात समावेश आहे.

आम्ही शहरातील १८ मेट्रो स्थानकांसह रेल्वे स्टेशनवरून ‘शेअर ए रिक्षा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी भाडे किती आकारावे हे देखील ठरवून दिलेले आहे. यासह ज्यांना मीटरप्रमाणे रिक्षाने प्रवास करायचा असेल तर ती सुविधा देखील मिळणार आहे. यामुळे नागरिकांसह रिक्षा चालकांना देखील फायदा होणार आहे.- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :Puneपुणे