कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:08 IST2021-07-22T04:08:36+5:302021-07-22T04:08:36+5:30

पुणे : कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांचे घराणेही कलाकारांचे आहे. त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या ...

Start monthly honorarium for artists | कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे

कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे

पुणे : कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांचे घराणेही कलाकारांचे आहे. त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात, कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे, असे आवाहन लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सुरश्री फाऊंडेशनच्या वतीने गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लावणी, सांगीतिक कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणा-या हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाऊनने अवघड केले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व कलाकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी बाळासाहेब दाभेकर, अशोक पुणेकर, शिवसंग्राम पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, मनोज पुणेकर उपस्थित होते.

Web Title: Start monthly honorarium for artists