अवयवदान जागृतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा
By Admin | Updated: March 22, 2017 03:32 IST2017-03-22T03:32:09+5:302017-03-22T03:32:09+5:30
अवयवदान चळवळ ही समाजाची आजची सर्वात मोठी गरज आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाने आता अवयवरोपण शक्य झाले असूनही

अवयवदान जागृतीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा
पुणे : अवयवदान चळवळ ही समाजाची आजची सर्वात मोठी गरज आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाने आता अवयवरोपण शक्य झाले असूनही सर्वसामान्य नागरिकांना त्याची विशेष माहिती नाही. त्यामुळे नागरिकांना याची माहिती व्हावी यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा अशी मागणी नगरसेवक आबा बागुल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली.
सर्वसामान्यांना आरोग्यविषयक गोष्टींसाठी जागृत करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे असा कक्ष सुरू करण्यात काहीही गैर नाही. अवयवदान कसे आणि कुठे, त्यातही वेळेत कसे होईल आणि एखाद्याला जीवनदान देणे कसे शक्य आहे, याबाबत ठोस माहिती नागरिकांना नसते. या माहितीसाठी कुठे संपर्क साधावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहिरातींद्वारे जनजागृतीसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मरणोत्तर अवयवदान करावयाचे आहे किंवा अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना हा पालिकेचा कक्ष मार्गदर्शक
ठरेल.
तसेच हा उपक्रम अवयदानाच्या चळवळीसाठी राज्यातच काय देशातही दिशादर्शक ठरेल. त्यामुळे या सेलची उभारणी तत्काळ होणे गरजेचे असून, त्यासाठी अंदाजपत्रकातही विशेष तरतूद करावी असे बागुल यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)