हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
By Admin | Updated: May 9, 2017 03:45 IST2017-05-09T03:43:31+5:302017-05-09T03:45:46+5:30
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानात (नेहरूनगर) महापालिका शाळांमधील

हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानात (नेहरूनगर) महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हॉकीचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. ते ४ जूनपर्यंत चालणार आहे.
उद्घाटन महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये ४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना प्रशिक्षक गणेश लांडगे व श्रीधरन तंबा हे प्रशिक्षण देत आहेत. शिबिर रोज सकाळी ७ ते १० या वेळेत आहे. उद्घाटन प्रसंगी सहायक आयुक्त योगेश कडूसकर, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, माजी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच स्टॅनली डिसूजा, राजेंद्र नागपुरे, नंदकुमार आढारी, अशोक तेलंगी ,सुनील रेणुसे आदी उपस्थित होेते.