तारे प्रचारात अवतरलेच नाहीत
By Admin | Updated: February 17, 2017 05:18 IST2017-02-17T05:18:26+5:302017-02-17T05:18:26+5:30
निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल, तर उमेदवारांना आठवण होते ती ‘सेलिब्रिटीं’ची. यंदा मात्र कलाकारांनी तीन ते सात लाख

तारे प्रचारात अवतरलेच नाहीत
पुणे : निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकायचा असेल, तर उमेदवारांना आठवण होते ती ‘सेलिब्रिटीं’ची. यंदा मात्र कलाकारांनी तीन ते सात लाख रुपयांपर्यंत मानधन सांगितल्यामुळे उमेदवारांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे. हे मानधन परवडणारे नसल्याने उमेदवारांनीच कलाकारांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित कलाकारांचा अपवाद सोडला, तर ‘तारे प्रचारात अवतरले’च नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे कलाकारांविना सुरू असलेल्या प्रचारमोहिमा काहीशा फिक्या वाटत आहेत.
यंदा शिवसेनेतर्फे ‘श्री राजा शिवछत्रपती’फेम डॉ. अमोल कोल्हे, ‘होममिनिस्टर’फेम आदेश बांदेकर आणि नाट्य कलाकार शरद पोंक्षे निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. कोल्हे यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे, तर बांदेकर हे मुंबईमध्ये शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. महेश मांजरेकर, भरत जाधव, आनंद इंगळे, विनय येडेकर हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. मात्र, हे सर्व कलाकार नाटक आणि चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने पक्षाच्या प्रचारासाठी पुण्यात येण्याची शक्यता कमीच. (प्रतिनिधी)