निधीसाठी तारेवरची कसरत
By Admin | Updated: November 28, 2014 23:17 IST2014-11-28T23:17:25+5:302014-11-28T23:17:25+5:30
बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची एकीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेळगावचे दर्शन घडविणारे बोधचिन्हही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

निधीसाठी तारेवरची कसरत
पुणो : बेळगावमध्ये 95 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची एकीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. बेळगावचे दर्शन घडविणारे बोधचिन्हही प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र, संमेलनासाठी निधी कुठून, आणि कसा उभा करायचा? हे आयोजकांना पडलेले कोडे मात्र अद्याप सुटलेले नाही.
संमेलनाच्या निधीसाठी गोव्याच्या कोळसा खाण उद्योगांवर भिस्त ठेवण्यात आली होती. मात्र, खाणीच बंद झाल्यामुळे पैसा कुठून आणायचा, या चिंतेने आयोजकांना ग्रासले आहे. आता मराठी अस्मितेच्या मुद्यावर मतप्रदर्शन करणा:या महाराष्ट्रातील राजकारण्यांनीच संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी आर्त साद बेळगाव नाटय़ परिषदेने घातली आहे.
अनेक वर्षानी बेळगावात नाटय़ संमेलनाची घंटा वाजणार आहे. त्यामुळे तेथील मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध उपक्रमांच्या आयोजनांच्या माध्यमातून संमेलनाची वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न बेळगाव नाटय़ परिषदेकडून करण्यात येत आहे. संमेलनासाठी मोठय़ा संख्येने नाटय़प्रेमी आणि रंगकर्मी बेळगावात येणार आहेत. त्यांची निवास, खानपान सेवा यांसह संमेलनासाठीचा एकूण खर्च हा 2 कोटी रुपयांच्या घरात
जाणार असल्याचा अंदाज आयोजकांकडून बांधण्यात आला आहे. मात्र, एवढा निधी उभा करणो ही आयोजकांसाठी अशक्यप्राय गोष्ट ठरत आहे. (प्रतिनिधी)
1 ज्या ज्या ठिकाणी निधीसाठी आयोजक जात आहेत, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. बेळगावात फाउंड्रीचा मोठा उद्योग आहे. गोव्याच्या खाण उद्योगावरही आयोजकांची भिस्त होती. मात्र, या खाणीही बंद झाल्यामुळे निधीसाठी हात तरी कोणाकडे पसरायचे, अशी अवस्था आयोजकांची झाली आहे.
2 कर्नाटक-सीमा प्रश्नाचे घोंगडे अनेक वर्षापासून भिजत पडले आहे. येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर झालेला अत्याचार आणि बेळगावचे ‘वेळगावी’ झालेले नामकरण या पाश्र्वभूमीवर हे संमेलन बेळगावमध्ये होत आहे. मराठी अस्मितेचा जाज्वल्य इतिहास सांगणा:या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तरी संमेलन निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘बोधचिन्हा’तून बेळगाव दर्शन
4बेळगाव नाटय़ परिषदेकडून नाटय़ संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध करण्यात आले. बेळगाव हे ‘वेणूग्राम’ म्हणजे बांबूंचे गाव म्हणून ओळ्खले जात होते. म्हणून बांबूचा वापर यात करण्यात आला आहे. बेळगावचा कशिदा प्रसिद्ध असल्याने, त्याला कशिद्याची बॉर्डर ठेवली आहे, तर सार्वजनिक वाचनालयाचे ऐतिहासिक घडय़ाळ (टॉवर) याचाही समावेश करण्यात आला आहे.
4बोधचिन्ह तयार करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती, त्यातून 16 बोधचिन्हांची निवड करण्यात आली. मात्र, नाटय़ संमेलनाला सयुक्तिक असलेले एकही बोधचिन्ह नसल्याने परिषदेनेच ऑरेंज डिझायनिंग स्टुडिओच्या संदेश कुंभारकर यांच्याकडून हे बोधचिन्ह तयार करून घेतले.
नाटय़ संमेलनासाठी प्रत्येक मराठी माणसाने आणि कलेच्या उपासकाने हे संमेलन आपले आहे, असे समजून जर व्यक्तीमागे शंभर रुपये दिले, तरीही लोकनिधीतून हे संमेलन होऊ शकणार आहे. असे झाले, तर कोणापुढेही हात पसरण्याची गरज भासणार नाही.
- वीणा लोकूर,
अध्यक्ष, बेळगाव नाटय़ परिषद.