राष्ट्रवादी युवकांच्या पाठीशी खंबिरपणे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:10 IST2020-12-29T04:10:50+5:302020-12-29T04:10:50+5:30

सणसर लासुर्णे जिल्हा परिषद गटातील कुरवली, चिखली, जांब या सह परिसरातील युवकांनी तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांची बेलवाडी (ता. ...

Stand firmly behind the NCP youth | राष्ट्रवादी युवकांच्या पाठीशी खंबिरपणे उभी

राष्ट्रवादी युवकांच्या पाठीशी खंबिरपणे उभी

सणसर लासुर्णे जिल्हा परिषद गटातील कुरवली, चिखली, जांब या सह परिसरातील युवकांनी तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांची बेलवाडी (ता. इंदापूर)येथील आनंद या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कुरवलीचे सरपंच बापूराव पांढरे,बेलवाडीचे उपसरपंच नानासो पवार ,आयुब सय्यद, अक्षय पांढरे, दिलीप पांढरे, विजय चव्हाण, भीमराव दणाणे,निलेश पांढरे, बबलू खुड, वाजीद सय्यद, संजय पांढरे, विश्वास दणाण, कृष्णजीत पांढरे, लहू चव्हाण, प्रशांत मान, आबा पाटील, सुनील चव्हाण, अशोक पांढरे आदी उपस्थित होते.

शुभम निंबाळकर म्हणाले, या भागातील युवकांच्या प्रश्नांना राष्ट्रवादी च्या माध्यमातून न्याय मिळावा व या गटातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद गटातील रस्ते,वीज, पाणी इत्यादी मूलभूत समस्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सोडवणूक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या सहकार्यामुळे विविध विकासकामे तालुक्यात झाली आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनासाठी तरुणांचे साथ आवश्यक असून आगामी काळात पक्षसंघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Stand firmly behind the NCP youth