शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळणार आता ऑनलाईन : अनिल कवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:04 IST

नागरिकांच्या सोयीसाठी व पारदर्शक कारभारासाठी निर्णय

ठळक मुद्देप्रकरणांची घरबसल्या माहिती मिळणारसंबंधित कर्मचाऱ्यांना प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित मुद्रांकासह परताव्यासाठीच्या विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक

पुणे : मुद्रांक व नोंदणी फी परतावा मिळण्यासाठी नागरिकांना नोंदणी व मुद्रांक विभागाकडे सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. तसेच, यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी येत्या ३० डिसेंबरपासून संपूर्ण राज्यात मुद्रांक व नोंदणी फी परतावा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मिळणार  असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.  नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सदर प्रणाली अर्जदारांकरिता विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायिकेतर मुद्रांकाचा किंवा दस्तनोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापि दस्तनोंदणी न केलेल्या नोंदणी फीचा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रकरणालीमध्ये डाटा एंट्री करणे आवश्यक आहे.ही डाटा एंट्री करणे म्हणजे परताव्यासाठी अर्ज करणे असा अर्थ नसून डाटा एंट्री केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर रिफंट कोड नमूद करून परताव्यासाठीच्या विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.तसेच, या प्रणालीच्या वापरासंदर्भात आवश्यक असलेले प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. ......प्रकरणांची घरबसल्या माहिती मिळणारऑनलाईन परतावा प्रणालीमुळे परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी होणार असल्याचे कवडे यांनी स्पष्ट केले. पक्षकाराला परतावा प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे किंवा कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे, हे पोर्टलवर घरबसल्या समजेल. या संदर्भातील एसएमएस त्याला येईल. तसेच परतावा आदेश व इतर पत्रव्यवहार डाऊनलोड करता येईल. ऑनलाईन परतावा प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता निर्माण होणार आहे.  या प्रणालीच्या वापरात अडचण असल्यास सारथी हेल्पलाईन क्रमांक ८८८८००७७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कवडे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनGovernmentसरकारRevenue Departmentमहसूल विभाग