शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

म्हाडातील अल्प उत्पन्न गटातील घरांना मुद्रांक दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 21:00 IST

जीएसटी शुल्कामध्ये सात टक्क्यांची सवलत दिल्यानंतर, मुद्रांक शुल्क देखील नाममात्र आकारण्याचा निर्णय घेतल्याने, नागरिकांच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होणार आहे.

ठळक मुद्दे ही सवलत केवळ पहिले घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सध्या खरेदीखतासाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क, १ टक्का अधिभार आणि १ टक्के मेट्रो रेल्वे शुल्क असे सात टक्के दराने शुल्क सरकारच्या व्याख्येनुसार ४५ लाख रुपयांच्या आतील सदनिकांसाठी ही सवलत

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), नियोजन प्राधिकरण अथवा प्रधानमंत्री आवास योजनांसाठी प्राधिकृत केलेल्या संस्थांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अथवा अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी केवळ १ हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावा लागेल. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) शुल्कामध्ये सात टक्क्यांची सवलत दिल्यानंतर, मुद्रांक शुल्क देखील नाममात्र आकारण्याचा निर्णय घेतल्याने, नागरिकांच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होणार आहे. ही सवलत केवळ पहिले घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी राहील. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जीएसटी कौन्सिलने अल्प उत्पन्न गटासाठी आकारण्यात येणारे शुल्क ८ वरुन १ टक्का आणि इतर घरांचे शुल्क १२ वरुन ५ टक्के केले आहे. परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत ४५ लाख रुपयांच्या आतील सदनिका येतात. जीएसटीच्या दरातील बदलामुळे घरांच्या किंमतीत ७० हजार ते ३ लाख १५ हजार रुपयांपर्यंत कमी होतील. सध्या खरेदीखतासाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क, १ टक्का अधिभार आणि १ टक्के मेट्रो रेल्वे शुल्क असे सात टक्के दराने शुल्क भरावे लागते. त्यामुळे अत्यल्प गटासाठी १ हजार रुपये शुल्क नाममात्र ठरणार आहे. जवळपास तीन लाख रुपयांपर्यंत बचत या माध्यमातून होईल. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्लूएस) आणि अल्प उत्पन्न गटामधील (एलआयजी) नागरिकांच्या पहिल्या सदनिकेसाठी १ हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय ३१ मार्च २०१८ रोजी राज्य सरकारने घेतला होता. मात्र, ही सवलत नक्की कोणकोणत्या गृह योजनांसाठी लागू राहील याबाबत स्पष्टता नव्हती. त्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने २० फेब्रुवारी रोजी सुधारीत राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्या नुसार म्हाडा, संबंधित नियोजन प्राधिकरण, गृह निर्माण विभागाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्राधिकृत केलेल्या संस्थांमधील घरांना ही सवलत लागू राहिल, असे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहक हीत संरक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत जोशी म्हणाले, जीएसटी पाठोपाठ मुद्रांक शुल्कामध्ये देखील कपात केल्याना अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होतील. सरकारच्या व्याख्येनुसार ४५ लाख रुपयांच्या आतील सदनिकांसाठी ही सवलत असेल. त्याचा मोठा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना होईल.  

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाHomeघरGovernmentसरकारGSTजीएसटी