शिवनेरीच्या पायथ्याशी टपाल खात्याच्या वतीने स्टॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:15 IST2021-02-21T04:15:49+5:302021-02-21T04:15:49+5:30

पुणे विभागाचे डाक घर अधीक्षक आर. पी. घुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

Stall on behalf of the Postal Department at the foot of Shivneri | शिवनेरीच्या पायथ्याशी टपाल खात्याच्या वतीने स्टॉल

शिवनेरीच्या पायथ्याशी टपाल खात्याच्या वतीने स्टॉल

पुणे विभागाचे डाक घर अधीक्षक आर. पी. घुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टपाल विभागाच्या वतीने यावेळी टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा, फिलाटेली काउंटर, पोस्टाच्या विविध योजना यांची माहिती शिवभक्तांना देण्यात आली. यावेळी विपणन अधिकारी अभिजित काळे, गणेश जगताप, डॉ. एस. बी. कांबळे, तिकीट संग्राहक व अभ्यासक विनायक आवटे, जुन्नर विभागाचे सहायक अधीक्षक आर. पी. झावरे यांनी शिवभक्तांना माहिती दिली.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी भारतीय टपाल खात्याच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर शिवभक्तांना माहितीपत्रक देताना टपाल खात्याचे अधिकारी.

Web Title: Stall on behalf of the Postal Department at the foot of Shivneri