एसटी तिकीट दरवाढ १७ टक्के,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:08 IST2021-07-12T04:08:46+5:302021-07-12T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळ वाढत्या डिझेल दर व रोजच्या होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे प्रवासी तिकीट दरात ...

एसटी तिकीट दरवाढ १७ टक्के,
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळ वाढत्या डिझेल दर व रोजच्या होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ जवळपास 17 टक्के असेल मात्र ती लागू करायची की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.
राज्यात रोज सध्या जवळपास 10 हजार एसटी गाड्या धावत आहे. रोजचे उत्पन्न 8 कोटी इतके आहे. डिझेल दरवाढी मुळे जवळपास एसटीला रोज 2 कोटीचा फटका बसत आहे. एकीकडे घटलेली प्रवासी संख्या तर दुसरीकडे इंधनामुळे रोज 2 कोटींचा बसणारा फटका यामुळे एसटी च्या संचालक मंडळाने 17 टक्के तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सध्या ही परिस्थिती पाहता.दरवाढी चा बोजा सामान्य प्रवाशावर टाकणे कितपत योग्य होईल याचा विचार करून अद्याप हा निर्णय लागू करण्याचे आदेश देण्यात आले नाही.