शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपकरी रोजंदारी कामगारांना घरचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:32 IST

कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देया कामगारांच्या जागी प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची नियुक्ती

पुणे : वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून अघोषित बंद पुकारणाऱ्या कामगारांना साथ देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रोजंदारी कामगारांना प्रशासनाने घरचा रस्ता दाखविला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल १ हजार १० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. वेतन करार अमान्य असल्याचे सांगून राज्यातील एसटी कर्मचारी ८ आणि ९ जूनला संपावर गेले होते. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. यामुळे एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. राज्यात ९ हजारांहून अधिक रोजंदारी कामगार महिना-दोन महिन्यापूर्वी सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचा २०१६ ते २० च्या कामगार वेतन करारशी कोणताही संबंध नाही. त्यानंतरही १ हजार १० रोजंदारी कर्मचारी अघोषित संपात सहभागी झाले. ते कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याच कारणास्तव त्यांची एसटी महामंडळातील सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कामगारांच्या जागी प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची नियुक्ती केली जाईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारी