शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे स्मार्ट प्रीपेड कार्ड कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:25 IST

अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग प्रवाशांना एसटीच्या प्रवास शुल्कामध्ये ७५ टक्के आणि त्याच्या सोबत असणाऱ्या एका व्यक्तीस ५० टक्के सवलत दिली जाते.

पुणे : राज्य मार्ग परिवहन विभागाच्या (एसटी) वतीने दिव्यांग नागरिकांना देण्यात येणारे प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरण रखडले आहे. कार्ड रीडिंग करण्याची यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग प्रवाशांना एसटीच्या प्रवास शुल्कामध्ये ७५ टक्के आणि त्याच्या सोबत असणाऱ्या एका व्यक्तीस ५० टक्के सवलत दिली जाते. त्यासाठी दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो. त्या अर्जाची प्रत घेऊन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे जावे लागते. तेथे अपंगत्व दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिका आणि दोन फोटो द्यावे लागतात. त्यानंतर येथून देण्यात येणारा पास घेऊन एसटीच्या आगारात जावे लागते. समाज कल्याण विभागाने दिलेल्या पासवर एसटी मान्यतेचा शिक्का मारते.

दिव्यांगांची यातून सुटका करण्यासाठी एसटीने स्मार्ट कार्ड देण्याची योजना आणली. त्यासाठी काही काळ नोंदणी देखील सुरू केली. मात्र, एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून स्मार्ट कार्ड वितरण थांबविण्याचा आदेश दिला.

‘प्रीपेड कार्डला विरोध’दिव्यांगांना रेल्वे, एसटी, पीएमपी अशा विविध सार्वजनिक सेवांसाठी एकच कार्ड असावे अशी दिव्यांगांची जुनी मागणी आहे. एसटी प्रीपेर्ड कार्ड देत असून, त्यावर काही रक्कम असणे बंधनकारक आहे. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. रेल्वे प्रमाणे ओळखपत्र दाखविल्यास सवलतीचे तिकीट दिले पाहिजे. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असण्याची अट लागू करू नये. त्यास संघटनेचा विरोध असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले. 

दिव्यांग स्मार्ट कार्र्डची नोंदणी थांबविण्याच्या सूचना आल्या आहेत. स्मार्ट कार्डमधे किमान तीनशे रुपये असणे आवश्यक आहे. मात्र, कार्ड वाचण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे काही कार्ड तयार असूनही, वितरित करण्यात आले नाहीत. पुढील सूचना आल्यानंतर लवकरच पुन्हा नोंदणी सुरु करण्यात येईल.- एस. डी. भोकरे,वाहतूक अधिकारी, एसटी