एसटीची चाके थांबली; कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 01:34 PM2021-10-28T13:34:48+5:302021-10-28T13:51:00+5:30

रोज जवळपास 1400 गाडया स्वारगेटला येतात आणि जातात. पण आज बेमुदत बंदमुळे स्वारगेट डेपोतून एकही गाडी सुटली नाही.

st service stopped staff indefinite shutdown passengers in trouble | एसटीची चाके थांबली; कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद, प्रवाशांचे हाल

एसटीची चाके थांबली; कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत बंद, प्रवाशांचे हाल

googlenewsNext

पुणे: जिल्ह्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामुळे एसटीची जिल्ह्यातील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बंदची कल्पना बऱ्याच प्रवाशांना नव्हती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. रोज जवळपास 1400 गाडया स्वारगेटला येतात आणि जातात. पण आज बेमुदत बंदमुळे स्वारगेट डेपोतून एकही गाडी सुटली नाही. ऐन दिवाळीच्या हंगामात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने परिवहनलाही मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांनाही या त्रासाला सामोरे जावे लागता आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच इतर भत्तेही एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावेत अशी मागणी केली आहे. हा बंद बेमुदत असल्याने तो कधी माघारी घेतला जाईल याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण तोपर्यंत प्रवाशांना ऐन दिवाळत या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची शक्यता  आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यात एसटीने जवळपास 17 टक्क्यांची भाडेवाढ केली होती. दिवाळीच्या हंगामात ही भाडेवाढ केल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. त्यात आता आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 
 

Web Title: st service stopped staff indefinite shutdown passengers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.