शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट बसस्थानकात एसटी प्रवाशांची पळवापळवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 23:30 IST

खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट सक्रिय, प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देकमी तिकीट दराचे अमिष दाखवून प्रवाशांना नेले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोरकाही वर्षात खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आव्हान उभे केल्याने एसटीच्या प्रवाशांमध्ये घट

पुणे : प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. पण बसस्थानकातून एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट प्रवाशांना पळवून नेत आहेत. याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याने एजंटांना मोकळे रान मिळत असल्याची स्थिती स्वारगेट बसस्थानकात आहे. कमी तिकीट दराचे अमिष दाखवून प्रवाशांना नेले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. मागील काहीवर्षात खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आव्हान उभे केल्याने एसटीच्या प्रवाशांमध्ये घट झाली असून उत्पन्नही कमी झाले आहे. यापार्श्वभुमीवर एसटीने त्यांना टक्कर देण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या वातानुकूलित बससेवेचे दरही प्रवाशांच्या आवाक्यात आहेत. आता एसटीने विनावातानुकूलित शयनयान बसही सेवेत आणली आहे. कमी तिकीट दरात प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवासी संख्येत वाढ करणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण या उद्देशाला एसटी प्रशासनाकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. खासगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंटे बसस्थानकांमध्ये उजळ माथ्याने फिरून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. त्याचा फटका एसटीला बसत असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये केलेल्या पाहणीत खासगी ट्रॅव्हलचे एजंटचा मुक्त संचार दिसून आला. या स्थानकातून दादर, ठाणे, बोरीवली, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी यांसह विविध ठिकाणी जाण्यासाठी शिवनेरी, शिवशाही, हिरकणी बस उपलब्ध आहेत. बसच्या श्रेणीनुसार त्यांचे तिकीट दर वेगवेगळे आहेत. दादर, ठाण्याला जाण्यासाठी करंट बुकींगसाठी स्वतंत्र खिडक्या आहेत. सांगली, सातारा, कोल्हापुरसाठीही अशीच व्यवस्था आहे. खासगी ट्रॅव्हलचे एजंट थेट याठिकाणी येऊनच प्रवाशांना कमी तिकीट दराचे अमिष दाखवून नेत आहेत. तिथे एसटीचे, चालक, वाहक, बुकींग करणारे कर्मचारी असतात. जवळच आगार प्रमुखांचे कार्यालय आहे. पण या एजंटला कुणीही साधे हटकत नसल्याचेही दिसून आले. सुरक्षारक्षक नेमल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. पण बसस्थानकात दीड तासांत एकही सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी एंजटला हुसकावून लावताना दिसून आला नाही. त्यामुळे ही एजंटगिरी मुक्तपणे सुरू होती. तिकीट खिडकीव रांगेत उभे राहून त्रासलेले प्रवासीही एजंटसोबत जाऊन एसटीला नाकारत असल्याचे चित्र आहे. --------------------ठाणे, दादर व बोरीवलीला जाणाºया शिवनेरी बससाठी अनुक्रमे ४४०, ४६० आणि ५२५ रुपये तिकीट दर आहे. खासगी ट्रव्हल्सकडून केवळ ३०० ते ३५० रुपयांत प्रवाशांना नेले जाते. वाशी, सायन, चेंबुरसाठीही खासगी ट्रव्हल्स उपलब्ध होत आहेत. कोल्हापुरसाठी एसटीचे ४३० रुपये तिकीट असून खासगी ट्रव्हल्सकडून केवळ २५० रुपयांत नेले जात आहे. शिवनेरीपेक्षा १०० ते १५० रुपयांनी तिकीट कमी असल्याने प्रवासीही तिकडे जात आहेत. त्यामुळे एसटी प्रवासी कमी होत असल्याचे चित्र आहे.बसस्थानकामध्ये एजंटांना रोखण्याबाबत पोलिस प्रशासनाला वारंवार पत्र दिली आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांनाही सुचना दिलेल्या आहे. अधिकारी व कर्मचारीही त्यांना रोखतात. काही जणांवर कारवाईही केली आहे. पण आता पुन्हा काही नवीन एजंट दिसत आहेत. - स्वाती आवळे, आगार प्रमुख, स्वारगेट----------

टॅग्स :Puneपुणेswargate bus depotस्वारगेट बसस्थानकTravel Tipsट्रॅव्हल टिप्सpassengerप्रवासी