शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक महिलांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल : प्रतिभा पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 21:02 IST

मातृत्व, ममत्व व कर्तृत्व यातून या महिला बसचालक उद्याचा आदर्श ठरतील..

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन, सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे़. या महिला एसटी बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला़.    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसचालकपदी १६३ महिलांची निवड केली आहे़. त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला़. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़.नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार माधुरी मिसाळ, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, माधव काळे  उपस्थित होते़ पाटील म्हणाल्या, महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे़. आज महिला विमाने चालवित असून, लष्करातही आहेत़. पण महिलांकडून मोठी बस चालविणे तसे आजपर्यंत पाहिले नाही़. अशावेळी एसटीच्या चालक ताफ्यात दाखल झालेल्या महिलांचे धाडस कौतुकास्पद आहे़. महिलांना संधी मिळाली तर त्या संधीचे त्या सोने करतात. हे त्यांनी यातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे़. मी १९६२ मध्ये आमदार असताना एसटी जवळून पाहिली असून, एसटीविषयी माज्या मनात आपुलकी आहे़. महिलांमध्ये जन्मत:च मातृत्व असते, त्यामुळे सर्व महिला चालक मातृत्वाच्या भावनेनेच बस चालवतील व त्यातून एक आदर्श निर्माण करतील़. मातृत्व, ममत्व व कर्तृत्व यातून या महिला बसचालक उद्याचा आदर्श ठरतील, असे दिवाकर रावते यांनी सांगितले़. दरम्यान एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोत पास देण्याची योजना सुरू असून, याद्वारे निवृत्तीनंतर कर्मचारी व त्यांची पत्नी किंवा पती यांना ६५ वर्षांपर्यंत एसटीचा मोफत पास दिला जाणार आहे. महिला सश्क्तीकरणाच्या धोरणाचे कृतीशील पाऊल एसटी महामंडळाने महिला बसचालक नियुक्तीच्या माध्यमातून टाकल्याचे डॉ़ .नीलम गोऱ्हे यांनी सांगितले़. यावेळी सन २०१७ व २०१८ साली विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच पुरपरिस्थतीत आदर्शवत काम करणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा सत्कार केला़.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलDiwakar Raoteदिवाकर रावते