मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या एसटी बसची वायरिंग जळाली

By Admin | Updated: October 16, 2014 06:09 IST2014-10-16T06:09:50+5:302014-10-16T06:09:50+5:30

खेड आळंदी विधानसभा मतदार सघांतील चास (ता.खेड) येथे मतदान यंत्र घेवून जाण्यासाठी आलेल्या परिवहन महामंडाळाच्या बसची वायरिंग शॉर्टसर्कीट झाल्यामुळे जळाली

The ST bus wiring, which was carrying a polling booth, burnt | मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या एसटी बसची वायरिंग जळाली

मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या एसटी बसची वायरिंग जळाली

चासकमान: खेड आळंदी विधानसभा मतदार सघांतील चास (ता.खेड) येथे मतदान यंत्र घेवून जाण्यासाठी आलेल्या परिवहन महामंडाळाच्या बसची वायरिंग शॉर्टसर्कीट झाल्यामुळे जळाली. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दुसरी एस.टी.बस पाठवून मतदान यंत्रे व कर्मचारी नेण्यात आले.
ारिसरातील मिरजेवाडी, आखरवाडी, पापळवाडी, कमान येथील मतदान यंत्रे सकंलीत करून एस.टी.बस चास येथे मतदान यंत्रे घेण्यासाठी आली. बसच्या केबीनमधून धूर येत असल्याचे कर्मच्याऱ्यांनी चालकाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बसमधील मतदान कर्मचारी व यंञे तातडीने खाली उतरवून ठेवन्यात आली. डी.वाय.एस.पी.संजय पाटील या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी यंत्रांनाकडे करून दुसरे वाहन आल्यावर मतदान यंत्रे सुरक्षित मार्गस्त करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The ST bus wiring, which was carrying a polling booth, burnt