शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

बसचालक-वाहक दिसणार चॉकलेटी रंगाच्या गणवेषात; ७० वर्षांत प्रथमच बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:33 IST

वर्षानुवर्षे खाकी कपड्यात दिसणारे बसचे वाहक आणि चालकांच्या कपड्याचा रंग गडद होणार आहे. हा कलर चॉकलेटी रंगाकडे झुकणारा आहे.

ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यक्रम‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान’ या संस्थेकडे देण्यात आले होते काम

पुणे : नवीन वर्षांत एसटीतील कर्मचाऱ्यांच्या पेहरावात बदल करण्यात येणार आहे. शिपायापासून ते बसचा चालक आणि वाहकाचा गणवेश देखील बदलला आहे. वर्षानुवर्षे खाकी कपड्यात दिसणारे बसचे वाहक आणि चालकांच्या कपड्याचा रंग गडद होणार आहे. हा कलर चॉकलेटी रंगाकडे झुकणारा आहे. त्यामुळे त्यात फारसा बदल जाणवणार नाही. महिला वाहकासाठी साडीचा देखील पर्याय उपलब्ध असेल. गेल्या सत्तर वर्षांत प्रथमच गणवेशात बदल होत आहे. येत्या ६ जानेवारीला (शनिवारी) मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन ‘गणवेश वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यक्रम होईल. पुण्यात आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते गणवेशाचे वितरण होईल.  एसटी महामंडळात विविध १६ विभागात १ लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात होते. मात्र, ते कापड पसंत न पडल्याने आपल्या  सोईने कर्मचारी गणवेशाचे कापड खरेदी करीत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिले, तर नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता? हे ओळखणे कठीण होत असे. त्यामुळे एकाच पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये अगदी रंगापासून शिलाई पर्यंत वैविध्य दिसून येई. त्यामुळे गणवेश (युनिफॉर्म) हा शब्दच त्यांच्या बाबतीत चुकीचा ठरत होता. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीतील ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान’ या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश ‘डिझाईन’ तयार करण्याकरीता नेमण्यात आले होते. या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील एसटीच्या कर्मचाऱ्यांशी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधून, त्यांचे कामाचे स्वरूप, त्याच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले. त्याचे सादरीकरण सर्व कामगार व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींपुढे करण्यात आले. त्यावर यांच्या सूचना मागविण्यात आल्या. त्यानुसार त्यात आवश्यक ते बदल करुन गणवेश  तयार करण्यात आले आहेत. शिपाई, वर्क शॉपमध्ये काम करणारे, बस चालक आणि वाहक अशा विविध विभागात काम करणाऱ्यांचे गणवेश बदलण्यात आले आहेत. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र