एसआरएची साह्य समिती रद्द

By Admin | Updated: October 29, 2016 04:35 IST2016-10-29T04:35:02+5:302016-10-29T04:35:02+5:30

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा

SRA's Sahay Samiti canceled | एसआरएची साह्य समिती रद्द

एसआरएची साह्य समिती रद्द

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्किटेक्टकडून धमकावल्याच्या प्रकाराची पालकमंत्र्यांनी शुक्रवारी गंभीर दखल घेऊन कारवाईचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी अचानक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एसआरएची साह्य समिती रद्द करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयातून काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे शहरात ४८६ झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांचे रूप पालटण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविली जात आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाचा विषय असल्याने या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले
आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना याचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असावे की पालकमंत्र्यांकडे, यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना याचे पदसिद्ध अध्यक्षपद देण्यात आले होते. त्याचबरोबर, प्राधिकरणाला मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी २०१६ रोजी साह्य समिती गठित करण्यात आली.
या समितीत पालकमंत्र्यांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि आयुक्त, विधान परिषद सदस्य आणि पोलीस आयुक्त आदी सदस्यांचा समावेश होता.
शुक्रवारी मुंबईमध्ये एसआरएबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अचानक साह्य
समितीच रद्द करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे. गुरुवारी एसआरएच्या कार्यकारी
अधिकाऱ्यांना झालेली दमदाटी, या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी घातलेले लक्ष या पार्श्वभूमीवर सायंकाळी साह्य समितीच रद्द करण्याचा निर्णय झाल्याने विविध तर्कविर्तक लढविण्यात येत आहेत.
(प्रतिनिधी)

२००६ मध्ये झाली होती स्थापना
साह्य समितीची स्थापना २००६मध्ये झाल्यानंतर प्रत्यक्षात या समितीच्या खूपच कमी बैठका झाल्या. एसआरएची नियमावली २०१४मध्ये बदलण्यात आली. त्यानंतर एसआरए प्रकल्पाबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. जुन्या प्रकल्पांना जुने नियम लागू आहेत की नवीन, यावरून बरेच वाद निर्माण झाले आहेत. यामुळे एसआरएच्या अनेक योजना रखडल्या आहेत.
एसआरए प्रकल्पाच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी साह्य समित्यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, समितीकडून प्रत्यक्षात त्यासाठी खूपच कमी प्रयत्न झाले. एसआरएचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून दबाव वाढत चालला आहे. त्यातून वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

Web Title: SRA's Sahay Samiti canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.