शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर! सयाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:27 IST

वडाच्या नावाने चांगभलं म्हणून करणार वृक्षारोपण 

पुणे : झाड हेच माणसांचा श्वास असून, त्यामुळेच आपण जीवंत आहोत. त्यामुळे त्यांना जपणे आवश्यक आहे. झाडांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितले होते आणि गडांवर वृक्षराजी बहरू दिली होती. पण नंतरच्या काळात अनेक गडांवरील झाडे कमी झाली. आता पुन्हा गड-किल्ले हिरवाईने नटविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन येत्या शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधून काढतात. नातं घट्ट करतात. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आता वृक्षांसाठी काम करणाऱ्यांना एकत्र आणण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या शिवसुर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. आणि हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो. प्रत्येक गडकिल्ल्यावर सुमारे ४०० रोपं लावण्यात येणार आहेत. चला तर मग शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्यावर, देवराई मध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली, त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" देऊया. आणि या छोट्या परंतु महत्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओ ची एक चित्रफीत तयार करून सहृ्याद्री देवराईकडे पाठवायचे आहे.——————————————शिवरायांचे गडकिल्ले बोडके झाले आहेत. त्यांना परत हिरवाईने फुलवू या. गडकिल्ल्यांवर देशी झाडे लावून शिवजयंती साजरी करूया. प्रत्येक शिवजयंतीला या झाडांचा  वाढदिवस साजरा करू आणि शिवरायांना आगळेवेगळी मानवंदना देऊया.- सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते

टॅग्स :PuneपुणेFortगडsayaji shindeसयाजी शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज