कोरेगाव भिवर येथे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:11 IST2021-04-09T04:11:35+5:302021-04-09T04:11:35+5:30

कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथे राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत, पंचायत समिती दौंड आणि ग्रामपंचायत कोरेगाव भिवर यांच्या ...

Spontaneous response to vaccination at Koregaon Bhiwar | कोरेगाव भिवर येथे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरेगाव भिवर येथे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरेगाव भिवर (ता. दौंड) येथे राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत, पंचायत समिती दौंड आणि ग्रामपंचायत कोरेगाव भिवर यांच्या विद्यमाने आरोग्य उपकेंद्र कोरेगाव भिवर येथे एक दिवसीय लसीकरण शिबिरात दोनशेहून अधिक ग्रामस्थांना कोविडशिल्ड लस देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पांढरे यांनी दिली.

येथे एकदिवसीय लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचेचाळीस वर्षावरील पुढील नागरिकांना लस देण्यात आली.लसीकरणासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आरोग्य सहाय्यक संभाजी कोकडे,परिचारिका मीनाक्षी शिंदे,परिचारिका उषा सावके यांनी लसीकरण प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

यावेळी सरपंच चिंतामण मस्के,उपसरपंच सोमनाथ काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Spontaneous response to vaccination at Koregaon Bhiwar