स्वयंभू फाउंडेशन व भाजपाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:57+5:302021-06-02T04:08:57+5:30

या शिबिरामध्ये विविध आजारांचे तसेच ब्लडप्रेशर, शुगर असणाऱ्यांना मोफत तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच, मूतखडा व इतर शस्त्रक्रिया ...

Spontaneous response to Swayambhu Foundation and BJP's health camp | स्वयंभू फाउंडेशन व भाजपाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वयंभू फाउंडेशन व भाजपाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

या शिबिरामध्ये विविध आजारांचे तसेच ब्लडप्रेशर, शुगर असणाऱ्यांना मोफत तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच, मूतखडा व इतर शस्त्रक्रिया संदर्भातील मार्गदर्शन डॉ. भावना बोरसे व डॉ. पूजा भिंगार्डे यांनी केले.

या शिबिरामध्ये फुरसुंगी परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. या शिबिराला परिसरातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये डाॅ. बाळासाहेब हरपळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, बाबा बावस्कर, जगताप मेजर यांनी शिबिरास भेट दिली.

मोफत आरोग्य शिबिरामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांना या मोफत शिबिराचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे या वेळी शिबिराचे आयोजन भाजपा मध्य हवेली उपाध्यक्ष संतोष हरपळे यांनी सांगितले. या शिबिरास स्वयंभू फाउंडेशनचे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Spontaneous response to Swayambhu Foundation and BJP's health camp