शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पिंपरी शहरात थुंकणाऱ्यांकडून दोन दिवसांत १८ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:45 IST

गेल्या दोन दिवसांत आरोग्य विभागाची ११९ थुंकीबहादर यांच्यावर कारवाई ; सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये दंड

ठळक मुद्देथुंकीमधून या विषाणूंचा प्रसार होतो अधिक वेगाने; महापालिकेची विशेष मोहीम स्वत:बरोबरच शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या १०५ शाळा

पिंपरी : कोनोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शहरात कुठेही पिचकाऱ्या मारणाऱ्यांची आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांची आता खैर नाही. गेल्या दोन दिवसांत आरोग्य विभागाने ११९ थुंकीबहादर यांच्यावर कारवाई करून सुमारे १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.   

* कोरोनापासून बचावासाठी स्वच्छता बाळगणे, वारंवार हात धुणे, उघड्यावर थुंकू नये ही खबरदारी घ्यावयाची आहे. परंतु, काही थुंकीबहाद्दर पान, मावा, गुटखा खाऊन रस्ते, इमारतीच्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारतात. महापालिकेच्या आठ प्रभागात पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. थुंकणाऱ्यांसोबतच रस्त्यावर दुर्गंधी करणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा शौच करणाऱ्यांकडूनही दंड आकारला जात आहे. 

.........................................

दरम्यान, थुंकीमधून या विषाणूंचा प्रसार अधिक वेगाने होतो. ही थुंकी सुकली नाही, तर पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत स्वत:बरोबरच शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ..........* अशी आहे दंडाची आकारणी....सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये दंड, रस्त्यावर घाण करणे १८०, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे २००, उघड्यावर शौचास बसणे ५०० रुपये असा दंड आहे. दंड भरलाच नाही, तर पोलिसांत यासंबंधी तक्रार दिली जाऊ शकते, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापूर्वी नागरिकांना गांभिर्याने विचार करावा लागणार आहे.

................................

* शाळांमध्ये घ्यावी दक्षता... जनजागृतीसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी स्थानिक पातळीवर जसे शाळा, सार्वजनिक वाचनालये, झोपडपट्टी परिसरात काहीही उपाययोजना राबविल्याचे दिसत नाही. शहरात महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक विभागाच्या १०५ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणारे कष्टकरी, गरजू, श्रमिकांचे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी हे साहित्य खरेदी करू शकणार नाहीत. महापालिकेच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरस व साथीच्या आजारांपासून बचाव होण्याकरिता योग्य दर्जाचे मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस