शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

अंगावर थुंकल्याने तरुणावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 01:50 IST

पुणे : अंगावर थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली. ...

पुणे : अंगावर थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.अक्षय संजय भोसले (वय २४, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र मधुकर जाधव (वय ३४, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. १० आॅक्टोबर २०१८ रोजी सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली.

जाधव सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधनी परिसरातून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी ते थुंकले. जाधव यांच्या मागे दुचाकीवरून आलेल्या भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांना आमच्या अंगावर का थुंकतो? असे विचारले. त्यावेळी भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांना दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर जाधव हे तेथून पळून गेले. भोसले व त्याच्या साथीदारांनी जाधव यांचा पाठलाग करून पूना हॉस्पिटलच्या पुलावर त्यांना पुन्हा अडवले. त्यावेळी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करून मोबाइल, दुचाकीची किल्ली जबरदस्तीने हिसकावून पळून गेले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली होती. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी