स्पायडर स्पोर्ट्स, कॅटलिस्ट संघांचे विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:22+5:302021-02-21T04:20:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत स्पायडर स्पोर्ट्स, कॅटलिस्ट या संघांनी आपापल्या ...

स्पायडर स्पोर्ट्स, कॅटलिस्ट संघांचे विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत स्पायडर स्पोर्ट्स, कॅटलिस्ट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
लिजेंड्स क्रिकेट मैदानावर दर शनिवारी व रविवारी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अमित पवार (५० धावा व ३-२०) याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कॅटलिस्ट संघाने अयोध्या वॉरियर्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. अयोध्या वॉरियर्स संघाने २० षटकांत ८ बाद १२५ धावा केल्या. कॅटलिस्टकडून अमित पवार (३-२०), अमेय करमरकर (२-२२), समीउद्दीन शेख (१-३६) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान कॅटलिस्ट संघाने १६.२ षटकांत ४ बाद १२९ धावा करून पूर्ण केले. अमित पवारने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत २१ चेंडूत ५० धावा केल्या. अयोध्या वॉरियर्सकडून जयदीप आवाडने १८ धावात ४ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात समीर सिंग (४-१८)च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पायडर स्पोर्ट्स संघाने मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड संघाचा ८७ धावांनी पराभव केला.