शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाला मिळणार गती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:38 IST

गेली अनेक वर्ष रखडलेल्या जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देग्लोबल निविदा मंगळवारी उघडल्या ; आठ दिवसांत प्रस्ताव जपानाला पाठविणारप्रकल्पाच्या भूसंपादनापाठोपाठ साधारणपणे एसटीपी प्लॅन उभारण्यात येणार

पुणे: शहरातील बहुचर्चीत व प्रतिक्षित नदी सुधार प्रकल्पाची (जायका) च्या ग्लोबल निविदा मंगळवार (दि.१२) रोजी उघडण्यात आल्या. आता येत्या आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुढील प्रक्रियेसाठी व निविदा अंतिम करण्यासाठी हा प्रस्ताव जपान इंटरनॅशन कॉपोर्रेशन एजन्सीकडे (जायका) पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दोन-अडीच महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिली.   गेली अनेक वर्ष रखडलेल्या जायका प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनापाठोपाठ साधारणपणे एसटीपी प्लॅन उभारण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागर नियुक्त करण्यात आले असून, भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने प्रकल्पाचे काम देखील रखडले होते. परंतु केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आक्षेपामुळेही अडचणी निर्माण झाल्या. सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये रखडलेला जायका प्रकल्प प्रचाराचा मोठा मुद्दा ठरला होता. यामुळे सन २०१९ च्या निवडणुका जाहिर होण्यापूर्वी सत्ताधारी भाजपकडून जायकाचे काम सुरु होईल अशी अपेक्षा होती. यासाठी प्रयत्न देखील सुरु होते. परंतु निविदा जागतिक दर्जाच्या (ग्लोबल) असल्याने काही वेळ गेला. अखेर आता या निविदा उघडण्यात आल्या असून, निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले.     जायका प्रकल्पासाठी उघडण्यात आलेल्या निविदा जागतिक दर्जाच्या असल्याने व आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा जाहीर करण्यात आल्याने मंगळवारी या निविदा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सर्व प्रक्रिया पूर्ण करुन प्रस्ताव जपानला पाठविण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर  कामाची वर्क ऑर्डर देण्यात येईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेriverनदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका