शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

टेमघर धरणाच्या दुरुस्ती कामाला वेग; यावर्षी होणार ८० टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 22:00 IST

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या मॉन्सूनमधे शंभरटक्के धरण भरले.

ठळक मुद्देशॉर्टक्रिटचे काम घेतले हाती धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट उर्वरीत कामास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार धरणाच्या भेगांमधे २५ मिलिमीटर जाडीच्या बारची जाळी

पुणे : टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले असून, मजबुतीकरणाच्या कामाला वेग आला असल्याची माहिती जलसंपदातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षी राहिलेले पॉलिफायबर रिइन्फोर्समेंट शॉर्टक्रिटचे काम यंदा ८० टक्के पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे २०१६-१७ साली लक्षात आले. त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या मॉन्सूनमधे शंभर टक्के धरण भरण्यात आले होते. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिन्यांपासून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवार अखेरीस (दि. ३०) धरणात ०.२४ टीएमसी पाणीसाठा होता. याबाबत माहिती देताना टेमघर धरणाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. प्रदक्षिणे म्हणाले, धरणातील गळती रोखण्यासाठी ग्राऊटींग आणि पॉलिफायबर शॉर्टक्रिटचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील ग्राऊटींगचे बहुतांश काम गेल्यावर्षी झाले आहे. त्यावेळी शॉर्टक्रिटचे काम अवघे १० टक्के झाले होते. उर्वरीत कामास ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. लांबलेला पाऊस आणि धरण मोकळे करण्यासाठी दोन महिने लागल्याने कामास उशीरा सुरुवात झाली. दुरुस्तीचे काम २४ डिसेंबर पासून सुरु झाले असले, तरी २० जानेवारीपासून कामाने वेग घेतला आहे. यंदा शॉर्टक्रिटचे काम ८० टक्के पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून,संपूर्ण काम पुढील वर्षी होईल. दुरुस्तीच्या कामासाठी २० कोटी रुपये उपलब्ध झाले असून, येत्या अर्थसंकल्पामधे आणखी १५ कोटी रुपये मिळतील, असे प्रदक्षिणे यांनी सांगितले.  ---------काय आहे ग्राऊटींग आणि शॉर्टक्रिट...ग्राऊटींग (भेगा बुजविणे) व पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉटक्रिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येते. ग्राऊटींगसाठी सिमेंट, फ्लाय अ‍ॅश आणि मिश्रण घट्ट होण्यासाठी अ‍ॅक्सेलेटर लिक्विडचा वापर केला जातो. हे मिश्रण उच्चदाबाने भेगांमधे सोडले जाते. पॉलिफायबर शॉर्टक्रिट म्हणजे एकप्रकारचे धरणाच्या भिंतीतील प्लास्टर आहे. धरणाच्या भेगांमधे २५ मिलिमीटर जाडीच्या बारची जाळी बसविण्यात आली असून, १ मीटर अंतरावर बोल्ट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मजबुतीत वाढ होईल.  ------------दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी टेमघर धरणामधून सेकंदाला तब्बल अडीच हजार लिटर पाण्याची गळती होत होती. धरणाचा प्रकार, लांबी, उंची व पाणी साठविण्याची क्षमता या नुसार गळतीचे सामान्य प्रमाण किती असते, हे ठरविले जाते. या नुसार टेमघरमधे ७५ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती, सामान्य ठरते. गळती अडीचशे लिटर प्रतिसेकंदपर्यंत खाली आली आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर गळती बंद होईल. 

टॅग्स :Puneपुणेdam tourismधरण पर्यटनState Governmentराज्य सरकार