शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:00 IST

पीएमआरडीएच्या बैठकीत रिंगरोड, प्रधानमंत्री आवास योजनेवर चर्चा

पुणे : महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर (२३.३ कि.मी.) मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, तसेच हा प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला.मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. या वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते हे उपस्थित होते. पुणे मेट्रो लाईन-३ प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा असून, तो सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविला जाणार आहे. या वेळी प्रकल्पाच्या निविदा अटी व शर्तींवर चर्चा करण्यात आली.प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी सामितीकडे पाठविण्याचा निर्णय या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध प्रकल्पांतर्गत बाधित होणाºया कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीपीपी अंतर्गत उपलब्ध होणाºया सदनिका प्राधान्यक्रमाने वितरित करण्यास मुख्यमंत्र्यांनी या वेळी मान्यता दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास विकसकांनी सकारात्मक सहभाग नोंदविला असून १४ विकसकांकडून २२ हजार घरांची निर्मिती करण्यात येईल.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष ममता गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्तविभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.वाघोली बस डेपोचा प्रश्न चर्चेने सोडवापुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाघोली बस डेपो निर्माण करण्यासाठी प्राधिकरणाच्या अखत्यारीतील वाघोलीचा १,४५८ व अन्य ठिकाणचा ७,६८६ चौ.मी. भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने या वेळी मंजुरी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन मंडळ यांनी चर्चा करून अटी व शर्तींबाबत निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.९९ तलावांतून गाळ काढणारपीएमआरडीच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरणासाठी हवेली, खेड, मुळशी, मावळ, पुरंदर, शिरूर, भोर व वेल्हे या आठ तालुक्यांतील ९१ गावांमधील, सुमारे ९९ तलावांतून गाळ काढण्यात येणार आहे. त्या कामाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.पुणे महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक परिवहन आराखड्यास या वेळी मान्यता देण्यात आली. प्राधिकरण क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा प्रकल्पासाठी विकसकांकडून निधी वसूल करणे, पुणे रिंगरोड प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे