डिजिटल सातबारा उता-यांच्या कामाला गती : दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 07:02 PM2018-05-19T19:02:04+5:302018-05-19T19:02:04+5:30

शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन कार्यक्रमातील ई -चावडी अंतर्गत गाव नमुना नं. ७/१२ डिजिटल स्वाक्षरी करून तो आॅनलाईन उपलब्ध करून द्यायचा आहे,

Speed ​​of digital saat bara work: Deepak Mhaisekar | डिजिटल सातबारा उता-यांच्या कामाला गती : दीपक म्हैसेकर

डिजिटल सातबारा उता-यांच्या कामाला गती : दीपक म्हैसेकर

Next
ठळक मुद्देमुळशी तालुक्यातील पिरंगुट तलाठी कार्यालयाला भेट

पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुटच्या तलाठी कार्यालयाला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी अचानक भेट देवून तेथील आॅनलाईन कामकाजाची पाहणी केली. आॅनलाईन डिजिटल सातबाराच्या कामकाजाचा आढावा घेवून कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. 
यावेळी महसूल उपायुक्त प्रताप जाधव, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूलचे तहसिलदार दगडू कुंभार, मुळशीचे तहसिलदार प्रमोद घाडगे, नायब तहसिलदार भगवान पाटील, मंडल अधिकारी गणेश कदम, तलाठी हनुमंत चांदेकर उपस्थित होते.
शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन कार्यक्रमातील ई -चावडी अंतर्गत गाव नमुना नं डिजिटल स्वाक्षरी करून आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून द्यायचा आहे, या कामकाजाची पाहणी म्हैसेकर यांनी केली. मुळशी तालुक्यातील १ लाख २१ हजार सात बारांपैकी २६ हजार डिजिटल सातबारा उतारे स्वाक्षरीचे झाले असून उर्वरीत कामकाज जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ज्या गावांचे घोषणापत्र झालेले आहे, अशा गावांमध्ये खरेदी विक्रीच्या नोंदी या केवळ आॅनलाईन टाकण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
 महाभूमिलेख संकेत स्थळावर जावून त्यांनी आपले सरकार, ई चावडी मधील प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. तसेच नवीन शर्तीच्या नोंदीबाबत म्हणजे १ क मधील नोदींची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले. सामान्य जनतेला  डिजिटल स्वाक्षरी असणारे ७/१२ कसे मिळतील याची प्रात्यक्षिकासह माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. यावेळी म्हैसेकर यांनी भरे गावातील काही ७/१२ व 8 अ च्या नोंदीची, गावचा हस्तलिखित १ क व संगणीकृत १ क ची तपासणी केली.तसेच डिजिटल ७/१२ च्या पिरंगुट येथील कामकाजाबद्दल विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. 

Web Title: Speed ​​of digital saat bara work: Deepak Mhaisekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.