शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळाच्या विकासाला मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 14:46 IST

विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध मुद्दे तातडीने मार्गी लावण्यात येणार

ठळक मुद्देविमानफेऱ्यांची संख्या वाढविण्यास मर्यादा वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रोडमॅप तयार करणार

पुणे : एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना जागेअभावी पायाभुत सोयीसुविधांना खीळ बसत आहे. तसेच पर्यायी रस्त्यांचा प्रश्न, हवाई दलाशी संबंधित अडचणीचे मुद्दे, नवीन पार्किंग इमारत यांसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्याबाबत गुरूवारी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध मुद्दे तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. समितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष व खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बैठकीला खासदार अमर साबळे, आमदार सुनिल टिंगरे, विमानतळ संचालक अजय कुमार, पालिका आयुक्त सौरभ राव, उद्योजक शांतीलाल मुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील नियुक्त सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये विमानतळासाठी आवश्यक जागा, रस्ते विकास, पाणीपुरवठा, पोलिस चौकीचे स्थलांतर यांसह हवाई दलाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाली. तसेच इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ, मालवाहतुकीसाठी नवे टर्मिनल, विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ एकर जागेचे भूसंपादन, नवीन वाहतुक आराखडा, अत्याधुनिक ई-गेट उभारण्याबाबत पुढील वर्षभरात कार्यवाही करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.विमानतळ परिसरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि वाहतुक पोलिस एकत्रितपणे रोडमॅप तयार करतील. दहा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. तसेच नव्या इमारतीचे काम सुमारे २० टक्के पूर्ण झाले आहे. विमानसेवा वाढविण्यासाठी विमान कंपन्यांची बैठक घेणार असल्याचे बापट यांनी सांगितले. गुंजन चित्रपटगृहापासून विमानतळापर्यंत विनासिग्नल वाहने विमानतळापर्यंत जाण्याबाबत आढावा घेण्याच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.------------विमानफेऱ्यांची संख्या वाढविण्यास मर्यादामागील काही वर्षांपासून प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मात्र जागेअभावी विमानतळाचे विस्तारीकरण रखडले आहे. हे विमानतळ हवाई दलाचे असल्याने विविध निर्बंध आहेत. आता रात्रीही निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरू करता येऊ शकते. पण त्याला मर्यादा येत असल्याची माहिती अजयकुमार यांनी दिली. मागील काही वर्षातील प्रवासी संख्यावर्ष        प्रवासी२०१४-१५    ४१ लाख२०१५-१६    ५४ लाख२०१६-१७    ६७ लाख२०१७-१८    ८१ लाख२०१८-१९    ९० लाख

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळLohgaonलोहगाव